मेडिकल कॉलेजच्या मालमतेवर दरोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
दि.२२ पासून आमरण उपोषण करणार, रमेश उबळेंचा इशारा,पोलिस अधिक्षकाना निवेदन
सातारा शहरातील भंगारवाल्यानी काही लोकप्रतिनिधीच्या बागलबचंच्याना सोबत घेऊन १७ लाख रुपयांना इमारती विकत घेऊन भंगारवाल्यानी दिवसाढवळ्या दरोडा टाकून चोरून नेला आहे. या दरोड्याची कोणत्याही अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
कोरेगाव : शासकीय मेडिकल कॉलेजच्या शासकीय मालमत्तेवर दिवसाढवळ्या दरोडा टाकणारे लोकप्रतिनिधीचे बगलबच्चे, अधिकारी व भंगारवाल्याना जबाबदार धरून त्यांचेवर गुन्हा न दाखल केल्यास दि.२२ पासून संगमनगर येथील नियोजित मेडीकल कॉलेज च्या इमारतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधीक्षकाना निवेदनाद्वारे दिला असूल्याने आता पोलीस काय भूमिका घेणार, याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नुकतीच मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले आहे. काम सुरू झाले असले तरी सफसफाईच्या नावाखाली मेडिकल कॉलेजच्या जागेत असणाऱ्या २०० मोठ्या इमारती पडण्याचे काम सुरू आहे. हे काम कसलीही निविदा न काढता सुरू आहे. सदर जागेवरील लोखंड,विटा, रॅबीट, मुरूम, लाकडे, प्लॅष्टीक चोरीला गेले आहे. यामध्ये सातारा शहरातील भंगारवाल्यानी काही लोकप्रतिनिधीच्या बागलबचंच्याना सोबत घेऊन १७ लाख रुपयांना इमारती विकत घेऊन भंगारवाल्यानी दिवसाढवळ्या दरोडा टाकून चोरून नेला आहे. या दरोड्याची कोणत्याही अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. या दरोड्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा माल चोरीला गेला आहे. त्यामुळे न्याती बिल्डर्स, सुपरवायझर मुल्ला, बालाजी सिक्युरिटी, मेडिकल कॉलेजचे डिन चव्हाण, पीडब्ल्यूडी अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधीचे बगलबच्चे, भंगारवाले, या सर्वांनी मिळून हा व्यवहार केला असेल असे निदर्शनास येत आहे.यामध्ये शासनस्तरावर कोणतीही निविदा काढण्यात आली नाही.त्यामुळे संबंधित लोकांवर शासकीय मालमत्तेवर दरोडा टाकलेचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. अन्यथा गुरुवार दि.२२ पासून आपण संगमनगर येथील नियोजित मेडिकल कॉलेजच्या इमारतीसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे. यापूर्वीही मी आपणास निवेदन देऊन या दरोड्याच्या गुन्ह्याची चौकशी करून कारवाई करण्याची विनंती केली होती. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेवर दरोडा पडूनही साधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होत नाही. हे संशयास्पद असून करोडो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले नसताना सर्व जण शांत का आहेत? सर्वजण हात का वरती करत आहेत? याची जबाबदारी घेण्यासाठी कुणी का पुढे येत नाही? असे सवाल रमेश उबाळे यांनी करून पुढे म्हटले आहे, यातून एवढेच निदर्शनास येते की, शासकीय अधिकारी, भगारवाले, लोकप्रतिनिधीचे बगलबच्चे यांनी संगनमताने हा दरोडा टाकला आहे का? याची चौकशी होऊन संबंधितांवर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आपण दि.२२ पासून आमरण उपोषण करणार आहे.
प्राण गेला तरी मागे हटणार नाही !
सातारा येथे मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले आहे याचे आम्ही स्वागत करतो. परंतु या नावाखाली कुणाचा करोडो रुपये हडप करण्याचा हेतू असेल तर हे सहन केले जाणार नाही. जसे मेडिकल कॉलेजच्या नव्या कामाची जाहीर निविदा काढण्यात येणार आहे, तशी येथील जुन्या इमारती पडताना का जाहीर निविदा काढण्यात आली नाही? पडलेल्या इमारतीचे स्टील, विटा, जळण विकून कुणाचे खिसे गरम झाले आहेत. याची चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे. याचा तपास लागून त्यांची नावे न जाहीर होवून त्यांचेवर गुन्हा दाखल व्हायला पाहीजे. अन्यथा या उपोषणामध्ये माझा प्राण गेला तरी बेहत्तर मी मागे हटणार नाही, असा इशाराही रमेश उबाळे यांनी दिल्याने पोलीस प्रशासन हादरले आहे.


