संघटीत गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) पोलिसांना पाहिजे असणारा संशयित आरोपी महेश तपासे सातारा जिल्हा न्यायालयात शरण आला आहे. यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी सातारा कारागृहात (जेल) केली असून लवकर पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे.
सातारा : संघटीत गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) पोलिसांना पाहिजे असणारा संशयित आरोपी महेश तपासे सातारा जिल्हा न्यायालयात शरण आला आहे. यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी सातारा कारागृहात (जेल) केली असून लवकर पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे.
महेश तपासेसह त्याच्या टोळीविरुध्द सावकारीचा सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सुमारे 3 वर्षापूर्वी संशयितांना मोक्का लागल्यानंतर महेश तपासे पसार झाला होता. दोन दिवसांपूर्वी तो स्वत: न्यायालयात शरण गेला. सध्या ग्रामपंचायत निवडणूकीचा माहोल आहे. अशातच सातारा डीवायएसपीचे पद रिक्त असून अतिरिक्त कार्यभार आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी मोहन शिंदे यांच्याकडे आहे. ग्रामपंचायातच्या निवडणूका झाल्यानंतर पोलिस तपासे याचा ताबा घेण्याची शक्यता आहे.