maharashtra

करंजे येथून दुचाकीची चोरी


करंजे, ता. सातारा येथून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : करंजे, ता. सातारा येथून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री करंजी तालुका जावली गावच्या हद्दीत सुजित वसंतराव धनावडे वय 35 यांची राहत्या घरासमोर असणाऱ्या उघड्या शेडमध्ये पार्क केलेली दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर एमएच 11 एआर 8591 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार आर. एन. गायकवाड करीत आहेत.