चोरी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मांढरदेव बंद
सचिव सहसचिव व एका कर्मचाऱ्यांची पोलीस कोठडी वाढवली
मांढरदेव येथील काळुबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी व अपहार प्रकरणी निषेध करून, सखोल चौकशीची मागणी करत येथील व्यापारी व ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. मांढरदेव येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला.
वाई : मांढरदेव येथील काळुबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी व अपहार प्रकरणी निषेध करून, सखोल चौकशीची मागणी करत येथील व्यापारी व ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. मांढरदेव येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला. या प्रकरणात पोलीस कोठडीत असणाऱ्या सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे आणि कर्मचारी बळवंत ढेबे यांची पोलीस कोठडी चार दिवसांनी न्यायालयाने वाढवून दिली आहे. त्यामुळे पोलिसांना अधिकचा तपास करणे शक्य होणार आहे.
मांढरदेवी येथील काळुबाई मंदिरात दानपेटीतील रक्कम मोजत असताना झालेल्या चोरी प्रकरणाचा निषेध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्यासाठी मांढरदेवी येथील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली होती. त्याला आज मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे मांढरदेव येथील काळुबाई मंदिर परिसरात शुकशुकाट होता. दिनांक १२ डिसेंबर रोजी मांढरदेवी येथील काळुबाई मंदिरात दानपेटीतील रकमेची मोजणी करत असताना या कामी नेमण्यात आलेल्या निवृत्त बँक कर्मचाऱ्याने सहसचिवाने व एका कर्मचाऱ्याने एक लाख ६४ हजार रुपयाची रक्कम व सोन्याचे दागिने लाबविले होते. या प्रकरणी त्यांना अटक करून त्यांच्या घर झडतीमध्ये १४ लाख रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी निवृत्त बँक कर्मचारी सहसचिव चोपडे एका कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले होते त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती .यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत देवस्थानचा सचिव रामदास खामकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्याच्या घर झडतीतही पोलिसांना मुद्देमाल व देवस्थानची बँक पावत्या,बोगस चेक आढळून आले होते. या प्रकरणात अटक केलेल्या सर्वांची कसून चौकशी करावी, यांच्या मागे कोण आहे त्यांनाही ताब्यात घ्यावे, संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या व सध्या पोलीस कोठडीत असणाऱ्या सचिव रामदास खामकर सहसचिव चोपडे आणि कर्मचारी ढेबे यांची पोलीस कोठडी आज न्यायालयाने चार दिवसांनी वाढवून दिली आहे. त्यामुळे पोलिसांना आधीकचा तपास करणे शक्य होणार आहे. या प्रकरणात अटक केलेल्या निवृत्त बँक कर्मचारी खाजगी इसम राजेंद्र शामराव कदम वाई व इतर सचिन मांढरे व कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे करत आहेत.


