सातारा शहराजवळ झालेल्या अपघातात अरुण सीमाराम मोडक (वय 54, रा. स्वामी समर्थ मठ, कल्याण) हे ठार झाले. पहाटे हा अपघात झाला असून या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा शहराजवळ झालेल्या अपघातात अरुण सीमाराम मोडक (वय 54, रा. स्वामी समर्थ मठ, कल्याण) हे ठार झाले. पहाटे हा अपघात झाला असून या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, कल्याणहून कोल्हापूरकडे सुमो कार निघाली होती. सातार्याजवळ अजंठा चौक परिसरात आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला व ती दुभाजकावर आदळली. यात अरुण मोडक हे गंभीर जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला.


