सातारा शहरा नजीक असणाऱ्या एका मंगल कार्यालयातून एक लाख 83 हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यातील चार अल्पवयीनांचे अपहरण झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
युवतीचा विनयभंग करून दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याच्या तक्रारी कराड तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
खंबाटकी घाटामध्ये दत्त मंदीर जवळ दुपारी एक वाजता पुढील जाणारा मालट्रकचा ब्रेकफेल झाल्याने घाटात मागे एम. जी. हेक्टर या महागडया गाड्या घेऊन जात असलेल्या कंटनेरला धडक दिल्याने डिझेल टाकी फुटुन कंटेनरने तत्काळ पेट घेतला. यामध्ये कसलीही जीवित हानी झाली नाही. मात्र यामध्ये एकुण सहा एमजी हेक्टर गाड्या व कपडयाचे रोल तसेच दोन मालगाड्या असे मिळुन अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे.
चाटे शिक्षण समूह कराडच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन कराड या ठिकाणी ‘संकल्प यशाचा? वेध उज्वल भवितव्याचा’ या कार्यकमाचे आयोजन इ. 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने करण्यात आले होते. कार्यकमाची सुरूवात सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन व पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली.
कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल, याचा आराखडा तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
वाघजाई वाडी येथे लम्पीग्रस्त गाईने दहशत निर्माण केली असून या गाईवर योग्य उपचार करण्याची मागणी वाघजाईवाडी येथील शेतकरी करीत आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत सातार्यातील अॅड. कमलेश पिसाळ बिनविरोध निवडून आले असून सलग दुसर्यांदा त्यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे क्रीडाक्षेत्रातून अभिनंदन होत आहे.