मलकापूर, ता. कराड येथील मलकापूर फाट्यावर भरदिवसा युवकावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने वार केला. बुधवार दि. 15 रोजी सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवार दि. १५ रोजी वनविभाग कराड व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी संयुक्तपणे कारवाई राबवत कराड आणि मलकापूर येथे एकाचवेळी ५ रंग व्यवसायिक दुकानदारांवर छापा टाकला. यामध्ये सर्व दुकानात मुंगूस या वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षण असलेल्या वन्यप्राण्याच्या केसांपासून बनवलेले ब्रश मोठ्या प्रमाणात सापडले. या पाचही दुकानातून वनविभागाने 1 हजार 735 ब्रश जप्त केले आहेत.
वाहन संवर्गातील नव्या वाहतूक दंडाच्या नियमातून प्रवासी ऑटो रिक्षांना वगळण्यात यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कराड तालुका रिक्षा मालक-चालक संघटनेने निवेदनाव्दारे मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेकडून मंगळवार दि. १५ रोजी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर असलेले विमानतळ लहान व विनापरवाना आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि छोट्या खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र, या विमानतळामुळे आजूबाजूच्या 20 किमी अंतरातील परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
‘मी नागरिक’ फाऊंडेशन, कराडने आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी यापुढेही यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी, असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.
बेलवडे बुद्रुक, ता. कराड येथील अंगणवाडी व लगत उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवर विविध संदेश व चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भिंत बोलकी झाली असून गावाच्या सुशोभीकरणातही भर पडली आहे.
करमाळा, जि. सोलापूर येथील मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे. याचा बळीराजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कारखान्याच्या चेअरमनला अटक करा. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
मलकापूर नगरपालिकेच्या विठ्ठलदेव सोसायटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये निसर्ग ग्रुप, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने देशी झाडांचे रोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ, अर्जुन, कडुलिंब, काटेसावर, ताम्हण, बकुळ, बुच, कैलासपती आदी. जातीच्या झाडांचा समावेश आहे.
शाळांची कार्यालये फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणाऱ्या मुंबईच्या चोरट्यास पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून कराडसह सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 28 चोऱ्या उघडकीस आल्या आहेत.
बुधवार पेठेतील नगरपालिकेने खोदलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून विराट विजय चव्हाण या चिमुरड्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर येथील 'त्या' कामाला नगरपालिकेने स्थगिती दिली आहे.