वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघिय क्षेत्रात बांधकामे आणि झाडे लावण्याबाबत निर्बंध घालण्यात आले होते. याबाबत राज्याचे सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष दीपक कपूर यांच्याशी संपर्क साधून निर्बंधांबाबत अधिक स्पष्टीकरण व निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दीपक कपूर यांनी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणला (एएआय) पत्र पाठवून निर्बंध शिथिल करण्याबाबत विनंती केली आहे.
वारुंजी (विमानतळ) ता. कराड गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये ७ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड विमानतळ परिसरात लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.
कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.
मलकापूर नगरपालिकेला विविध नाविन्यपुर्ण संकल्पनेचा वारसा आहे. त्यानुसार नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत ‘माणुसकीच घर’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका बहुउद्देशिय विस्तारित इमारत झेड.पी कॉलनी, पाणी बील संकलन केंद्र येथे ‘माणुसकीच घर’ नावाचा उपक्रम उभारला आहे. गुरुवारी ९ रोजी यांसंकल्पनेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत.
दोन परदेशी भामट्यांनी बनावट एटीएम कार्डद्वारे लोकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांनी मलकापूरसह कोल्हापुरातही बनावट एटीएमद्वारे पैसे काढल्याची कबुली त्यांनी दिली होती. आता या परदेशी भामट्यांनी तब्बल वीस बँकांची बनावट कार्ड बनविली असल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. तसेच त्यांच्याकडील पासपोर्टही बोगस असल्याचे आढळून आले आहे.