maharashtra

कराडात एकाला लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून मारहाण; दोघांना अटक


In Karad, one was beaten on the head with a wooden pole and floor; Both arrested
शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

कराड : शहरातील बुधवार पेठेत एकाला शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडके व फरशी डोक्यात घालून दोघांनी मारहाण केली. शुक्रवार दि. 10 रोजी रात्री 9.45  वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पवन दत्ता देवकुळे (वय 24) रा. बुधवार पेठ, कराड असे डोक्यात फरशी लागून जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. तर प्रतिक विजय साठे व योगेश दादा उर्फ राजू भोसले दोघेही रा. बुधवार पेठ कराड अशी मारहाण केलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवार पेठेतील प्रभात टॉकीजजवळ राहत्या घरासमोर पवन देवकुळे यांना प्रतिक साठे व राजू भोसले यांनी मारहाण केली. यावेळी प्रतिक साठे याने पवन देवकुळे याच्या डोक्यात फरशी घातली, तर राजू भोसले याने लाकडी दांडक्याने दंडावर व हातावर मारहाण करून जखमी केले. तसेच संशयितांनी पवन देवकुळे याच्या आजीलाही धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. जखमीवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. तर संशयित दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक संजय साळुंखे करत आहेत.