अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या येथील समाधी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन जिल्हा बँकेच्या उज्ज्वल परंपरेची घोडदौड कायम ठेवून बँक यशाच्या उच्च शिखरावर नेण्याची ग्वाही नुतन चेअरमन नितीन पाटील व व्हाईस चेअरमन अनिल देसाई यांनी यावेळी दिली.
सदाशिव ट्रेकिंग ग्रुपचा ज्युनियर सदस्य वर्धिश विजय लिगाडे याने गिरनार पर्वत सर केला. सदाशिव ट्रेकिंग ग्रुपच्या सोळा सदस्यांनी गिरनार ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. यामध्ये सर्वात तरुण (लहान) सदस्य वर्धिश विजय लिगाडे (वय ७ वर्ष), कृष्णा इंग्लिश मिडियम स्कूल, मलकापूरचा वरिष्ठ गट, तुकडी - अ चा विद्यार्थी आहे. वर्धिशने गिरनार डोंगररांगाच्या 9 हजार 999 पायऱ्या ५.३० तासात चालत पूर्ण केल्या. त्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून दोन परदेशी नागरिकांनी पैसे काढल्याची घटना घडली होती. आता याच परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही बनावट एटीएमद्वारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा प्रताप समोर आला आहे.
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार्या परदेशी दोन नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली होती. सदर दोघेही रोमानियाचे नागरिक असून त्यांना सोमवारी 6 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
साखरेच्या हंगामाशिवाय इतरवेळी वर्षभर इथेनॉल उत्पादनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ‘बायोसिरप’ या नव्या शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती पुणे येथील प्राज इंडस्ट्रीजने केली आहे. जागतिक स्तरावर पहिल्यांदाच बनलेल्या या नव्या तंत्रज्ञानाचे ग्लोबल लॉन्चिंग धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सच्या कार्यस्थळावर मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
बँकेच्या एटीएममध्ये घुसून संशयास्पद कृत्य करणार्या दोन परदेशी नागरीकांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी ५ रोजी सायंकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडे तब्बल सत्तर बनावट एटीएम कार्ड आढळली आहेत. संबंधित नागरीक रोमानिआ देशातील असल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून समोर आली आहे.
सुपने, ता. कराड येथे कार-दुचाकीच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कराड-पाटण मार्गावर रविवारी ५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश राजू चव्हाण व उदय रमेश चव्हाण दोघेही रा. सुपने ता. कराड अशी अपघातात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात कृष्णा हॉस्पिटलतर्फे पहिल्यांदाच डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लीट. पदवी बहाल करण्यात आली.