maharashtra

‘त्या’ दोन परदेशी भामट्यांचा कोल्हापूरातही प्रताप


The glory of 'those' two foreign vagrants in Kolhapur too
मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून दोन परदेशी नागरिकांनी पैसे काढल्याची घटना घडली होती. आता याच परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही बनावट एटीएमद्वारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा प्रताप समोर आला आहे.

कराड : मलकापूर, ता. कराड येथे बनावट एटीएम कार्डद्वारे बँकेच्या एटीएममधून नागरीकांच्या परस्पर त्यांच्या खात्यातून दोन परदेशी नागरिकांनी पैसे काढल्याची घटना घडली होती. आता याच परदेशी भामट्यांनी कोल्हापूरलाही बनावट एटीएमद्वारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याचा प्रताप समोर आला आहे. याबाबत पोलीस तपासात त्यांनीच पोलिसांकडे याची कबुलीही दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरातील प्रकार नक्की काय, याचा तपास करण्यासाठी येथील पोलिस पथक दोन्ही संशयीतांसह कोल्हापूर जिल्ह्याकडे रवाना झाले आहे.
बनावट एटीएम कार्डद्वारे नागरीकांच्या खात्यातून परस्पर रक्क काढून त्यांना लुबाडणाऱ्या दोन परेदशी नागरीकांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. तसेच पोलिसांनी क्लोनव्दारे तयार केलले ७५ बनावट एटीएम कार्डही संबंधितांकडून जप्त केले असून त्यातील ७१ कार्ड चालू स्थितीत आहेत. त्या कार्डवर तब्बल ३५ लाखांची रक्कम शिल्लक आहे. इस्फॅन लुस्टीन जुओर्गल (वय २९) व लुनेट व्हसइल गॅबरिअल (वय २८) दोघे रा. रूमानीया (रूमानीया देशाचे नागरीक) अशी त्यांची नावे  असून ते सध्या चार दिवसांची पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या पासपोर्टही नाही. तो दिल्ली पोलिसांनी जप्त केल्याची माहिती ते पोलिसांना देत आहेत. त्याची खात्री करण्याचे काम पोलिस करत आहेत.
दरम्यान, या दोन्ही परदेशी नागरिकांनी कोल्हापूर भागातही पर्सपर पैसे काढण्याचा उद्योग केल्याचे पोलीस तापासत समोर आले आहे. त्यांनी कोल्हापूरमध्येही एटीएममधून रक्कम लंपास केली होती. त्याची खात्री करण्यासाठी पोलिस पथक दोन्ही संशयीतांनाही घेवून कोल्हापूरला रवाना झाले आहे. कोल्हापूरच्या काही सहकारी बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याची त्यांनी कबुली दिली आहे. तेथे काही गुन्हे दाखल आहेत. या सर्व गोष्टीची पोलीस तपासात तयार होणारी साखळी अत्यंत महत्वाची असल्याने कोल्हापूरातील माहितीही या प्रकरणावर नव्याने प्रकाश टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवीन फसवणुकीचे प्रकार समोर येणार आहेत.