maharashtra

'सह्याद्रि'च्या पोलिस कर्मचारी आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० पेक्षा जास्त जणांची तपासणी


Spontaneous response to Sahyadri's Police Personnel Health Camp; Investigation of more than 100 people
सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्‍यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

कराड : येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 12 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी ७ रोजी शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. १०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचार्‍यांनी या शिबिराचा लाभ घेतला असून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
या आरोग्य आरोग्य शिबिरामध्ये वजन, ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेची पातळी, इ.सी.जी. आदीची तपासणी करण्यात आली. शिबिरात सह्याद्रि हॉस्पिटलचे तज्ञ फिजिशियन डॉ. महेश देशमुख यांच्याकडून तपासणी करून वैद्यकीय सल्ला देण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, सह्याद्रि हॉस्पिटल कराडचे संचालक अमित चव्हाण उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ.व्यंकटेश मुळे म्हणाले, कराड व परिसरातील नागरिक आणि प्रशासन यांचा आमच्यावरील विश्वास, दृढ होत गेलेले नाते, तसेच आमच्या युनिटमधील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचार्यांचे समर्पित प्रयत्न यामुळेच आमची 12 वर्षांची वाटचाल यशस्वी ठरली आहे. याच विश्वासामुळे नागरिकांसाठी जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सोयी-सुविधा आणण्यासाठी आणि अविरत रूग्णसेवेसाठी बळ मिळते. यापुढेही आमचे प्रयत्न असेच सुरु राहतील, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.