maharashtra

सुपने येथे कार-दुचाकीच्या धडकेत दोनजण गंभीर


Two seriously injured in car-bike collision at Supne
सुपने, ता. कराड येथे कार-दुचाकीच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कराड-पाटण मार्गावर रविवारी ५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश राजू चव्हाण व उदय रमेश चव्हाण दोघेही रा. सुपने ता. कराड अशी अपघातात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.

कराड : सुपने, ता. कराड येथे कार-दुचाकीच्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. कराड-पाटण मार्गावर रविवारी ५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. राकेश राजू चव्हाण व उदय रमेश चव्हाण दोघेही रा. सुपने ता. कराड अशी अपघातात जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सुपने येथील राकेश चव्हाण व उदय चव्हाण हे दोघेजण दुचाकीवरुन कराडकडे निघाले होते. त्यावेळी समोरुन आलेल्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातात राकेश व उदय दोघेही गंभीर जखमी झाले. तर अपघातग्रस्त कार रस्त्यावरुन खाली जाऊन झाडांमध्ये अडकली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेऊन जखमी युवकांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.