maharashtra

ना. मुरुगेश निराणी आणि ओमप्रकाश शेटे यांना कृष्णा विद्यापीठाची डी.लिट पदवी

कृष्णा हॉस्पिटलतर्फे पहिल्यांदाच डी.लिट पदवी प्रदान

Murugesh Nirani and Omprakash Shete have D.Lit degree from Krishna University
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात कृष्णा हॉस्पिटलतर्फे पहिल्यांदाच डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लीट. पदवी बहाल करण्यात आली.

कराड : येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा १० वा दीक्षांत सोहळा रविवारी ५ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. या सोहळ्यात कृष्णा हॉस्पिटलतर्फे पहिल्यांदाच डी.लिट पदवी प्रदान करण्यात आली. कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री ना. मुरुगेश निराणी आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक व मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांना कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लीट. पदवी बहाल करण्यात आली.
या सोहळ्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. भागवत कराड, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, कृष्णा अभिमत विद्यापठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. निराणी यांनी एमआरएन फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्तर कर्नाटकात आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, आजअखेर 1 लाखांहून अधिक लोकांना मोफत उपचार मिळवून दिले आहेत. तसेच 25 हजारहुन अधिक लोकांना मोफत नेत्रोपचार मिळवून दिले आहेत. याशिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.
ओमप्रकाश शेटे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक आहेत. 2015 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते. तसेच 2017-19 या काळात ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या काळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांच्या निधीची मदत केली आहे. याशिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.