maharashtra

वडोली-निळेश्वरमध्ये शालेय व्यवस्थापन समिती निवडीवरुन मारामारी

परस्पर विरोधी तक्रारी दाखल :  आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

Fight over school management committee selection in Vadoli-Nileshwar
वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

कराड : वडोली-निळेश्वर, ता. कराड येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्य निवडीवरून झालेल्या वादावादीचे रूपांतर मारामारीत झाले. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु असुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  वडोली निळेश्वर येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठक सुरु होती. त्यावेळी त्या समितीचा अध्यक्ष व सदस्य निवडीवेळी वादावादी झाले. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. त्यामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. त्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशीरापर्यंत कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात सुरु होती. यापरकरणी देण्यात येत असलेल्या फिर्यादीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.