‘मी नागरिक’ फाऊंडेशन, कराडने आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी यापुढेही यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी, असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.
कराड : ‘मी नागरिक’ फाऊंडेशन, कराडने आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद असून त्यांनी यापुढेही यशस्वी घोडदौड सुरू ठेवावी, असे प्रतिपादन दिलीप पाटील यांनी केले.
येथील ‘मी नागरिक’ फाउंडेशन संचलित जनसक्षम कन्सल्टन्सी ॲण्ड ट्रेनिंग सेंटर आणि सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयाचा त्यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ॲड. समीर देसाई, लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. अक्षय सुर्वे, सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. श्रीधरपंत सवाखंडे, बोधी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास मस्के, संस्कार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व मी नागरिक फाऊंडेशनचे संचालक ॲड. पंडित गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे कराड तालुका अध्यक्ष भूषण पाटील, बामसेफचे कार्यकर्ते सिंडीकेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत काकडे, यशदाचे मास्टर ट्रेनर अमोल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. समीर देसाई यांच्या हस्ते ‘मी नागरिक’ फाऊंडेशन व सम्यक प्रेरणा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. तर पै. अक्षय सुर्वे यांच्या हस्ते जनसक्षम कन्सल्टन्सी ॲण्ड ट्रेनिंग सेंटरच्या उद्घाटनाची फीत कापून व राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन आणि वृक्षाला जलदान करुन उद्घाटन करण्यात आले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत काकडे, डॉ. श्रीधरपंत सवाखंडे, अमोल जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अमोल कणसे, प्रशांत थोरवडे, ॲड. सुहास पाटील, डी.डी. दुपटे, विजय सोनवणे, ॲड. बापूसाहेब बनसोडे, विनोद बनसोडे, विकास मस्के आदी उपस्थित होते.


