maharashtra

शेतकऱ्यांना मारहाण करणाऱ्या मकाई कारखान्याच्या चेअरमनला अटक करा

साजिद मुल्ला : अन्यथा, बळीराजाच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा

Arrest the chairman of the corn factory for beating the farmers
करमाळा, जि. सोलापूर येथील ‌मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे. याचा बळीराजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कारखान्याच्या चेअरमनला अटक करा. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

कराड : करमाळा, जि. सोलापूर येथील ‌मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली आहे. याचा बळीराजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत कारखान्याच्या चेअरमनला अटक करा. अन्यथा, राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‌मकाई सहकारी साखर कारखान्याने गत गळीत हंगामातील एफआरपी सुमारे दोन ते तीन कोटी रुपये अद्यापही दिलेले नाहीत. एफआरपी थकविलल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सदर कारखाना सुरु करण्यास परवानगी नाकारली आहे. परंतु, तरीही हा कारखाना बेकायदेशीरपणे चालू झालाच कसा? असा प्रश्न कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांना शेतकरी विचारू लागले आहेत.
शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आपल्या हक्काचे, घामाचे ऊस बिल मागण्यासाठी करमाळा भागातील शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली मकाई साखर कारखान्याकडे केले होते.
दरम्यान, गत गळीत हंगामातील थकीत बिलासंदर्भात चर्चा चालू असताना मकाई साखर कारखान्याचे चेअरमन बागल तिथे आले. त्यांनतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत वाद घातला. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना मारहाण केली. याचा बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी निषेध नोंदवला. तसेच याप्रकरणी संबंधित चेअरमनवर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने मुल्ला यांनी केली आहे.
त्याचबरोबर या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बळीराजा शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राज्यभर तिव्र आंदोलन करेल. तसेच याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहणार असल्याचेही मुल्ला यांनी प्रसिध्दीपत्रकात नमूद केले आहे.