मलकापूर नगरपालिका परिसरात देशी झाडांचे रोपण
निसर्ग ग्रुप : कराड व मलकापूर नगरपालिचा संयुक्त उपक्रम
मलकापूर नगरपालिकेच्या विठ्ठलदेव सोसायटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये निसर्ग ग्रुप, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने देशी झाडांचे रोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ, अर्जुन, कडुलिंब, काटेसावर, ताम्हण, बकुळ, बुच, कैलासपती आदी. जातीच्या झाडांचा समावेश आहे.
कराड : येथील मलकापूर नगरपालिकेच्या विठ्ठलदेव सोसायटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये निसर्ग ग्रुप, कराड व मलकापूर नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने देशी झाडांचे रोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ, अर्जुन, कडुलिंब, काटेसावर, ताम्हण, बकुळ, बुच, कैलासपती आदी. जातीच्या झाडांचा समावेश आहे.
वृक्षारोपण शनिवार दि. 11 रोजी सकाळी 8 ते 9 यावेळेत करण्यात आले. यामध्ये मलकापूर नगरपालिकेचे भानुदास शिंदे, अविनाश बागल, विकास नलवडे, हर्षदा पाटील, सुरेखा जाधव, सुनेत्रा पाटील, शशिकला शिर्के, अमृता पाटील, सोहन काळुगडे, वैभव गुरसाळे, प्रसाद हिंगमीरे, सुरेश शिर्के, रोहन काळुगडे, अभिजित जाधव, मनोहर पवार, दीपक रायबागी यांनी सहभाग घेतला.
निसर्ग ग्रुप, कराडच्या सदस्यांनी आगाशिवगड पायथा व माथ्यावर हजारो वृक्षांची लागवड केली असून त्यांचे जतन व संवर्धन केले आहे. त्याचबरोबर लोकांना पर्यावरण व वृक्षारोपणाचे महत्व पटवून वृक्षलागवडीसाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यानुसार लोकांना विविध प्रकारची देशी रोपे देवून त्यांची लागवड करून ती वाढवण्यासाठी प्रोत्साहितही केले जात आहे. त्यासाठी निसर्ग ग्रुपच्या वतीने ‘वृक्ष आमचे संवर्धन तुमचे’ हा उपक्रम राबवण्यात येत असून आत्तापर्यंत ग्रुपच्या माध्यमातून लोकांना हजारो रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी भानुदास शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खड्डे काढून घेतले. तसेच त्यामध्ये लाल माती, कम्पोस्ट खत, ट्री-गार्ड, झाडांसाठी व ट्री-गार्डसाठी काट्या उभारणी, पाण्याचा टँकरची व्यवस्था केली होती. यासाठी निसर्ग ग्रुप, कराडच्या वतीने भानुदास शिंदे व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानण्यात आले.


