Karad

esahas.com

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू

कराड नगरपालिकेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

esahas.com

पांढरीचीवाडी (तारुख) येथे ऊसाच्या फडात आढळले बिबट्याचे तीन बछडे

पांढरीचीवाडी (तारुख) ता. कराड येथील धरे नावाच्या शिवारात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली. ऊसतोड मजुरांना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची पिल्ले सापडली. त्यांनतर याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनतर वनविभागाने बछड्यांची त्यांच्या आईसोबत मिलन घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.

esahas.com

कराडात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी

कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व तंत्रनिकेतनसाठी भरीव निधी मंजूर करणार आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातींच्या मुलींच्या होस्टेलसाठी 9 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असून असून पुढील वर्षापासून कराडमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण सुरू करण्यास मंजूरी दिल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी दिली.

esahas.com

शिवसैनिकांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत

सरकार सर्वसामान्य लोकांसाठी, तसेच त्यांचा विकास करण्यासाठी असते. महाराष्ट्राचा विकास गतीने होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत. सरकार म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्र्यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोचवून शिवसैनिकांनी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

esahas.com

बनावट सोशल अकाऊंट काढून तरूणीची बदनामी

एका युवकाने तरूणीचे बनावट फेसबुक, इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून तिची अश्‍लिल छायाचित्रे प्रसिद्ध केल्याची घटना घडली. हे कृत्य करणाऱ्या युवकास सातारा सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अमोल संपत बाबर (वय 26) रा. शहापूर ता. कराड असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

esahas.com

कराडात महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ

येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

esahas.com

कराड तालुक्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्या

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

esahas.com

करवडीत जमिन हद्दीच्या वादातून एकास मारहाण

करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

मलकापूरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिमेस प्रारंभ

मलकापूर शहरात दोन-तीन वर्षांपासून नागरिकांकडून भटकी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यास प्रारंभ केला असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.

esahas.com

किरपेतील बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.