गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात तसेच राज्यातही जवळजवळ सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 संबंधित विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या वैधतेच्या नूतनीकरणामध्ये देशातील व राज्यातील नागरिकांना तसेच वाहनमालकांना अडचणी येत आहेत. ज्या नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाच्या मुदती संपलेल्या आहेत, असे सर्व नागरिक व वाहनमालक देशातील तसेच राज्यातील विविध परिवहन
वाठार स्टेशन येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील हनुमान मंदिराच्या तसेच प्रमुख मंदिरांच्या बाहेर घंटा वाजवून घंटानाद व थाळीनाद आंदोलन केले.
जावली तालुक्यातील मार्ली घाटात वीस दिवसांपूर्वी पुरुष जातीचा एक अज्ञात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. असे असतानाच आज त्याच जागेपासून काही अंतरावर दुसरा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. हा सिरीयल किलिंगचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत जनतेतून संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
‘कोविड-19 या आजाराचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी व ग्रामीण रुग्णालयातील तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर व कर्मचार्यांनी कोविड रुग्णांना योग्य ते उपचार देण्याकामी व त्यांना सोयी-सुविधा पुरवण्याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल तसेच चांगले काम करणार्यांच्या ही पाठीशी ठाम पणे उभे राहणार आहे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असणारी सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे गेली कित्येक दिवसांपासून उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तरी देखील राज्य सरकारकडून दखल घेतली गेली नसल्याने आज शनिवारी (दि. 29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाबळेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावू लागल्याने सातारा जिल्ह्याची स्थिती गंभीर होवू लागली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 669 नव्या बाधितांची नोंद झाली आहे.
सातारा : कोरोनाची माहिती द्या आम्ही वैद्यकिय पथकातून आलो आहोत. असे सांगत घरामध्ये घुसून दरोडा टाकण्यासाठी पुण्यातून सातार्यात आलेल्या तिघांना सतर्क नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्यांचे इतर दोन साथीदार पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रविवार पेठेत घडली. गत दोन दिवसांपासून पाचजणांचे टोळके रविवार पेठेत संशयितरित्या फिरत होते. शुक...
सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत क्रिटीकल फेजवर आहे. संक्रमणाचा आतापर्यंतचा दर 18 टक्के आहे तर या आठवड्यातील दर तब्बल 22 टक्क्यांवर आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होईनासे झाले आहेत. ही परिस्थिती भयावह आहे. स्टेडियमवर चारशे बेडच्या जंबो हॉस्पिटलचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी राज्य शासनाला दिला आहे. मात्र, त्यास विलंब योग्य नाही. सातारा जिल्ह्याच्या संवेदनशील मागण्यांना राज्य सरकारने तत्काळ मंजूरी द्यावी अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी ग्व
म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रु
कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत. या संकटाशी सामना करताना त्यांच्या या लढाईला बळ देण्यासाठी ‘भाजपाचा जिल्हा महिला मोर्चा’च्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व