क्रीडा

esahas.com
क्रीडा

कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा

खटाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा विळखा वाढत चालला आहे. सध्या तालुक्यात कार्यरत असणारी कोविड सेंटर अपुरी पडत आहेत. अशा परिस्थितीत कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाचा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने वापर करावा, अशी मागणी खटाव तालुका सोशल फाउंडेशनसह अन्य सामाजिक संस्था, संघटना व प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे.

esahas.com
क्रीडा

वाकेश्‍वरमध्ये ‘नवशक्ती महिला बचतगटा’तर्फे हळदी-कुंकवासह आरोग्य साहित्याचेही वाटप

गौरी-गणपती सणानिमित्त घरी येणार्‍या महिलांना हळदी-कुंकवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्‍वर, ता. खटाव येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला.

esahas.com
क्रीडा

माण-खटाव तालुक्यांतील छावण्यातील भ्रष्टाचाराची विभागीय आयुक्तांकडे तक्रार 

माण-खटाव तालुक्यांतील चारा छावण्यांची बिले देताना प्रशासनाने आर्थिक तडजोड करून बिले काढली आहेत. तसेच या कार्यालयांतील विविध कामे दलालांमार्फत केली जात असून, त्याबाबतची तक्रार जिल्हास्तरावर करूनही न्याय मिळत नसल्याने या प्रकरणांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली आहे.

esahas.com
क्रीडा

सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळावी

कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे शेतातील पिकात पाणी साचून घेवडा, वाटाणा, बटाटा यांसह आणखी काही पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने प्रशासकीय यंत्रणेने संबंधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी जिल्हा परिषद कृषी सभापती मंगेश धुमाळ यांनी केली आहे.

esahas.com
क्रीडा

बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

कोरोना साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यानी कोणतेही मनोरंजनात्मक कार्यक्रम न करण्याचे व सार्वजनिकरित्या जमून खेळ न करण्याचे आदेश देऊनही निसराळे (ता.सातारा) येथे बैलगाडी शर्यतीत सहभागी झालेल्या सात जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात सर्वाधिक 575 कोरोनाबाधित

सातारा जिल्हा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतीत झाला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळू लागले आहेत. जिल्ह्यात गुरुवारीदेखील तब्बल 575 बाधित आढळले तर बारा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 12,218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 

esahas.com
क्रीडा

पाचगणीत ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

पाचगणी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने स्वतःची अनोखी अशी यंत्रणा आज राबवल्याने पालिकेच्या कर्मचार्‍यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत पाचगणीसह ग्रामीण भागात कसल्याही वाद्यांचा निनाद न करता शांततेने आणि उत्साहात घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात आज गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. 

esahas.com
क्रीडा

संभाजी ब्रिगेड फलटणचे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन

शेतकर्‍यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

esahas.com
क्रीडा

निकोप हॉस्पिटल कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टरांवर कारवाई करावी

येथील धर्मादाय व शासकीय विभागाशी निगडित अनुदानाचा लाभ उठवणार्‍या हॉस्पिटलचे कोव्हिड रुग्णांसाठी अधिग्रहण करण्यास विरोध करणार्‍या डॉक्टर व राजकीय पुढार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

esahas.com
क्रीडा

विट्याच्या राजा मंडळाकडून कोविड सेंटरला अत्याधुनिक मशीन भेट देणार

व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सिलिंडरची जिल्ह्यातील कमतरता पाहता या मशिन्स उपयुक्त ठरतील. म्हणून आम्ही विटा शहरातील दोन्ही कोविड सेंटरला हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा संकल्प केला आहे - अमोल बाबर