मूळचे कसबा पुणे येथील नकुलराव नितीनराव शितोळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुजा नकुलराव शितोळे या दाम्पत्याचा सिंगापूर येथे सुरू असलेला ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सिंगापूरवासियांना चांगलीच उर्जा देत आहे. हे दांपत्य गेली सलग आठ वर्ष आपल्या निवासस्थानी गणपती बाप्पासह गौरींची प्रतिष्ठापना करत आपला मराठी बाणा जपत आहे.
माण तालुक्यातील राणंद गावातील शिवाजीनगरमध्ये घरातील विजेच्या शॉर्ट सर्किटने आग लागून दोन घरे जळून खाक झाली आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याचे समजताच गावातील नागरिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. मात्र, घरात गॅस सिलिंडर असल्याने त्या ठिकाणी वातावरण भयभीत झाले होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.
‘आजचे संशोधन हे यूजीसीचा फोर्स, बढती, नियुक्ती आदी कारणांसाठी केले जात असून, संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे, असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके, आयएसएसएन, आयएसबीएन अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर, पत्रिका काढल्या जात आहेत. एपीआय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात, तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे. भाषा कोणती रूपे धारण करते आहे, याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही, अशा संशोधन कर
सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मलकापूर शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच खुनाची घटना घडल्याने संपुुर्ण मलकापूर, आगाशिवनगर परिसर हादरला. खून झालेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. दिवसभर शहरात या प्रकाराची चर्चा सुरू होती.
चालू शैक्षणिक वर्षामध्ये शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्य
कोव्हीड सेंटरमध्ये बेड व व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू लागली असतानाच रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातील कोरोना आता उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. शनिवारी पुन्हा 619 इतके बाधित सापडले असल्याने एकूण रुग्णसंख्या आता 13, 507 झाली आहे. दरम्यान, 14 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.