सोनके (ता. कोरेगाव) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील शाखांमध्ये संचालकांनी जवळील नातलगांच्या नावे बोगस कर्जवाटप केले. या प्रकारामुळे 12 कोटी 87 लाख 47 हजार 734 रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याप्रकरणी 21 संचालकांवर वाठार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाडळी तालुका कोरेगाव येथे घरफोडी करून 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल लांबवणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपी संजय अंकुश मदने राहणार वडूथ याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडील चोरी गेलेला मुद्देमाल 13 लाख 79 हजार आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन सहा लाख असा 19 लाख 79 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळाले आहे.
नगर विकास विभागाने नगरोत्थान अंतर्गत 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी सातारा शहरासाठी मंजूर केला आहे. या निधीवरून सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचा श्रेयवाद सुरू झाल्याचे पत्रकावरून स्पष्ट झाले.
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासोबतच फलटण शहरामधून जो पालखी मार्ग मार्गस्थ होत आहे, तो मार्ग सुद्धा व्यवस्थित करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती.
औंध, ता. खटाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलींची चोरी करणाऱ्या एकास जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोड्याच्या पूर्व तयारीतील एकाला अटक करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील धुमाळआळी येथे राहणाऱ्या संजय साहेबराव धुमाळ, वय ४५ याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील एस.टी. स्टँडमध्ये आत प्रवेश करणाऱ्या एस.टी. ने पायी चालत जात असणाऱ्या एकास धडक देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक नितीन तुकाराम निकम, वय ३०, रा. वशी, ता. वाळवा याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दुशेरे, ता. कराड गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हिसकावून, चोरून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वाई, ता. वाई येथे एस.टी. मध्ये चढत असताना एका महिलेचे १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.