देशातील उद्योगपतींची अब्जो रूपयांची वीज थकबाकी असताना त्यांना महावितरण अभय देत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या व देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याची वीज तोडणी करण्याचा सपाटा सातारा जिल्ह्यातील मुजोर महावितरण अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
गीते वखार चौक ते सावंत चौक यादरम्यान असणाऱ्या सुमारे 20 सदनिकांना गेल्या पंधरा दिवसापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रविवार पेठेतील हे नागरिक आक्रमक झाले.
कोश्यारी बाय बाय, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पोवई नाक्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा बद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे.
बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या मोहन माळेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमरलक्ष्मी (सातारा) येथे राहत असलेली मुलगी व नातु राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलीच्या वडीलांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली खटाव तालुका मराठी पत्रकार परिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली.
यवतेश्वर घाटातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
नोकरीच्या आमिषाने तिघांनी 5 लाख 18 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.