maharashtra

बस स्थानकातून सोन्याच्या मोहन माळेची चोरी


बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या मोहन माळेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या मोहन माळेची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड सातारा या ठिकाणी शिलाबाई अच्युत ढाणे रा. निनाम पाडळी, ता. सातारा यांची १२ ग्रॅम वजनाची, 36 हजार रुपये किंमतीची सोन्याची मोहन माळ अज्ञाताने हातचलाखी करून चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.