maharashtra

नोकरीच्या आमिषाने 5 लाख 18 हजारांची फसवणूक


नोकरीच्या आमिषाने तिघांनी 5 लाख 18 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : नोकरीच्या आमिषाने तिघांनी 5 लाख 18 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 ऑक्टोबर 2020 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान कृष्णत विठ्ठल जगदाळे रा. कुमठे, ता. कोरेगाव यांना यांचा मुलगा धनंजय तसेच आणखी एकाला अग्निशमन दलात सातारा येथे नोकरीस लावतो असे सांगून जगदाळे यांचा विश्वास संपादन करून तसेच खोटे अपॉइंटमेंट लेटर देऊन जगदाळे यांच्याकडून अनिकेत भीमराव जाधव भीमराव पांडुरंग जाधव दोघेही रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव आणि ओमकार सुभाष साळुंखे रा. शिरढोण, ता. कोरेगाव यांनी 5 लाख 18 हजार रुपये घेऊन नोकरी न लावता जगदाळे यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक लोहार करीत आहेत.