maharashtra

यवतेश्वर घाटातून दुचाकीची चोरी


यवतेश्वर घाटातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : यवतेश्वर घाटातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 12 दरम्यान यवतेश्वर, ता. सातारा येथील यवतेश्वर घाटात असलेल्या पाण्याच्या पाईपलाईन जवळ पार्क केलेली कुणाल राजाराम जाधव रा. शाहूपुरी, सातारा यांची बुलेट मोटरसायकल क्रमांक एमएच 03 बीआर 4081 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.