maharashtra

आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा


आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सैफ अली वजीर शेख वय 27 रा. कोंढवा पुणे यांच्या वडिलांकडून गजानन रामचंद्र कढणे रा. कोंढवा, पुणे आणि स्मिता गजानन कढणे रा. गणपती आळी, वाई यांनी जागेच्या विकसनासाठी शेख यांच्याकडून 8 लाख 5 हजार रुपये घेतले. यानंतर या दोघांनी पैसे परत न करता उलट ती जागा दुसऱ्या व्यक्तीला विकण्यासाठी दिली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.