साताऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भगतसिंह कोश्यारींना बाय-बाय
पोवई नाक्यावर हवेत फुगे सोडून केला आनंद साजरा
कोश्यारी बाय बाय, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पोवई नाक्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा बद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.
सातारा : कोश्यारी बाय बाय, अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी पोवई नाक्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामा बद्दल आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. युवा कार्यकर्त्यांनी फुग्यांना भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिमा बांधून ते फुगे हवेत सोडण्यात आले.
राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत करत कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. साताऱ्यात राष्ट्रवादी युवक च्या पदाधिकाऱ्यांनी साताऱ्यात अनोखे आंदोलन केले. यावेळी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी फुग्यांना राज्यपाल कोश्यारी यांची प्रतिमा बांधून ती हवेत सोडून दिली आणि कोश्यारी बाय-बाय अशी घोषणा दिली. कोश्यारी यांचा राजीनामा मान्य झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा केला. पोवई नाक्यावर नागरिकांना पेढे वाटण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक चे नेते तेजस शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष गोरख नलावडे, विद्यार्थी काँग्रेसचे अतुल शिंदे, महिला आघाडीच्या सविंदर जाधव, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, शफिक शेख, मंगेश ढाणे, प्रतीक कदम, आतिश कदम, सागर पवार, विकास अवघडे, महेश जाधव, प्रथमेश पवार, आकाश जाधव इत्यादी उपस्थित होते.


