सातारा जिल्ह्यातील कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. तसेच शासकीय काम बंद ठेवून निदर्शने केली. यामुळे सलग दुसर्या दिवशीही अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.
सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
सातारा जिल्ह्यातील कास पठार आणि परिसर हा वर्ल्ड हेरिटेज इको सेन्सिटिव्ह झोन असून याठिकाणी परवानगी शिवाय काही करता येत नाही याठिकाणी बांधकाम करण्यास बंदी असताना देखील , स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करून इथल्या जमिदाराला रखवालदार करुन , या ठिकाणी अनेक धनदांडग्यांनी अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी केली , ही बांधकामे करताना धनदांडग्यांनी प्रशासकीय यंत्रणेला हाताशà¥...
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा तालुका पोलिसांनी वडूथ गावच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून एकावर कारवाई केली आहे.
सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हयाची अर्थवाहिनी व सर्व सामान्यांची बँक असा नावलौकिक प्राप्त असलेल्या जनता सहकारी बँक लि., साताराचा ६० वा म्हणजेच हिरक महोत्सवी वर्धापनदिन ७ मार्च रोजी आनंद आणि उत्साहाचे वातावरणात झाला.
भुईंज फिडर, वाठार फिडर व कोरेगाव तालुक्यातील इतर फिडर ची विद्युत सेवा फेब्रुवारी महिन्यापासून दोन ते तीन तास मिळत आहे. या गोष्टीच्या निषेधार्थ राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने महाराष्ट्र वीज वितरणच्या कृष्णा नगर येथील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र व प्रख्यात अभिनेते पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे. ही घटना तासवडे परिसरात मंगळवारी सकाळी घडली.