maharashtra

जुगार अड्ड्यावर छापा


सातारा तालुका पोलिसांनी वडूथ गावच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून एकावर कारवाई केली आहे.

सातारा : सातारा तालुका पोलिसांनी वडूथ गावच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर छापा मारून एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ, तालुका सातारा गावच्या हद्दीत वडूथ ते सातारा रोड जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या आडोशाला पापा गेणू गवळी रा. प्रतापसिंह नगर, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून पाच हजार तीनशे रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.