महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाय सी कॉलेज सातारा ते सातारा बस स्थानकाकडे जाणाऱ्या बोगद्यामध्ये एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी मोटरसायकल क्रमांक एमएच 11 - 58 65 वरील चालकावर (नाव व पत्ता माहीत नाही) सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करीत आहेत.


