प्रेम प्रकरणातून एक वर्षापूर्वी अल्पवयीन मुली बरोबर बालविवाह होऊन त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती सातारा येथील जिल्हा रुग्णालयात झाली असून तिच्या पतीवर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे, कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये 6 हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2091 वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 12 लाख 66 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
संपूर्ण राज्यभरात बिफ हब म्हणून ओळखल्या जाणार्या फलटण तालुक्यामध्ये गेल्या अनेक दशकांपासून राजरोसपणे गोवंशाची कत्तल केली जात होती. महानुभाव पंथाची काशी समजल्या जाणार्या फलटणला याच बिफ माफियांनी आता जेरीस आणले आहे.
सातार्यात सत्संग सुरु असताना महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. सर्व महिला बाहेरील जिल्ह्यातील असून पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करत आहेत.
पाचगणी - वाई या मार्गावर शेरबाग जवळ एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात ५ जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भूविकास बँक चौकातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
विसावा नाका येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन नाही तर मतदान नाही, आमच्या मागण्या मान्य करा, कामगार एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली. तसेच शासकीय काम बंद ठेवून निदर्शने केली. यामुळे सलग दुसर्या दिवशीही अनेक शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र होते.