maharashtra

खंडाळा बोगद्यात जबरी चोरी


खंडाळा बोगद्यात अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केल्याची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : खंडाळा बोगद्यात अज्ञात चोरट्याने जबरी चोरी केल्याची फिर्याद खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 13 मार्च रोजी दुपारी तीन वाजता रोहिणी राजेंद्र महांगरे रा. मिरजेवाडी, ता. खंडाळा यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र खंडाळा बोगद्यात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले आहे. याबाबतची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एस. पांगारे करीत आहेत.