राजवाडा बस स्थानकातून 20 हजारांची चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राजवाडा बस स्थानकातून 20 हजारांची चोरी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 मार्च रोजी राजवाडा बस स्थानकात माऊली महादेव गायकवाड रा. आसनगाव कुमठे, ता. सातारा यांच्या शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या बॅगेत असलेले 20 हजार रुपये चोरून नेले आहेत. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक भोसले करीत आहेत.


