चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
१९८२ पासून मनोरंजन विश्वातील सर्वात अग्रगण्य ''अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंट'' तर्फे गुडी पाडव्या निमित्ताने मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म "अल्ट्रा झकास" लॉंच करण्यात आले आहे.
अपघात करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
राजवाडा येथील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या जिन्याच्या आडोशाला जुगाराचा डाव सुरु होता. शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दि. १७ रोजी दुपारी १ वाजता पाच जणांवर कारवाई केली.
पामतेल तेलाचे २२०० डबे देण्याचे आमिष दाखवून प्रतापगंज पेठेतील भारत ट्रेडींग कंपनी किराणा होलसेल व रिटेल या दुकान व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत घडली.
आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वर मधील गल्ली-बोळातून सुसाट कार पळवणाऱ्या कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दिन वलगे याला एक लाख नव्वद हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यासाठी रद्द करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय जिल्हा दौर्यावर येणार होते. आज त्यांचे पाचगणी येथे हेलिकॉप्टर द्वारे आगमन होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते येवू न शकल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडत हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने 8 मार्च ते 17 मार्च या कालावधीत ई-बॅंकिंग सेवांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.