राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय जिल्हा दौर्यावर येणार होते. आज त्यांचे पाचगणी येथे हेलिकॉप्टर द्वारे आगमन होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते येवू न शकल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडत हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
सातारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय जिल्हा दौर्यावर येणार होते. आज त्यांचे पाचगणी येथे हेलिकॉप्टर द्वारे आगमन होणार होते. मात्र काही कारणांमुळे ते येवू न शकल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडत हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दि. 18 व 19 मार्च रोजी सातारा जिल्हा दौर्यावर होते. पाचगणी येथील लग्नसमारंभासाठी ते उपस्थित राहणार होते. तसेच रविवारी वाई येथील बेल एअर हॉस्पिटलच्या नव्याने सुरु होणार्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार होते. मात्र, आज त्यांचे पाचगणी येथे आगमन न झाल्याने त्यांच्या दौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने आज दिवसभरात उन्हा-तान्हात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी मात्र हेलिपॅड शेजारीच क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.


