राजवाडा येथील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या जिन्याच्या आडोशाला जुगाराचा डाव सुरु होता. शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दि. १७ रोजी दुपारी १ वाजता पाच जणांवर कारवाई केली.
सातारा : राजवाडा येथील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या जिन्याच्या आडोशाला जुगाराचा डाव सुरु होता. शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दि. १७ रोजी दुपारी १ वाजता पाच जणांवर कारवाई केली.
सुरज सुदेश सावंत (रा. शुक्रवार पेठ, सातारा), सतिश महादेव शेडगे (रा. गडकरआळी, सातारा), अमित अशोक बागणीकर (रा. मंगळवार पेठ, सातारा), सागर मानसिंग सपकाळ (रा. शाहूपुरी, सातारा) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून ११ हजार ४३० रुपये जप्त केले.


