maharashtra

डीजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली ई-बॅंकिंग बाबत जनजागृती


रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने 8 मार्च ते 17 मार्च या कालावधीत ई-बॅंकिंग सेवांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.

सातारा : रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने 8 मार्च ते 17 मार्च या कालावधीत ई-बॅंकिंग सेवांबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये घरोघर जाऊन गावातील जनतेला ई-बँकिंग सेवांच्या सुरक्षित वापराबाबतची माहिती दिली. अलीकडील काळात आधुनिक बँकिंग सेवा सुविधांचा वापर वाढलेला असून शिक्षित लोकांबरोबरच अल्पशिक्षित लोक देखील विविध प्रकारच्या ई बँकिंग सेवांचा वापर करत आहेत. परंतु ही बँकिंग सेवांचा सुरक्षितपणे वापर कसा केला पाहिजे याबाबतची पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा बँकिंग संस्थांनी तशा प्रकारचे प्रशिक्षण दिलेले नसल्यामुळे ई बँकिंग सेवा वापरत असताना अनेक चुका होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अकाउंट हॅक करणे, परस्पर पैसे ट्रान्सफर करणे एटीएम कार्ड हॅक करणे, ऑनलाइन फ्रॉड असे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे. एटीएम, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग यासारख्या सुविधांचा वापर निष्काळजीपणे व अपुऱ्या माहितीच्या आधारे केला जात असल्यामुळे अनेक लोकांना आपले पैसे गमवावे लागत आहेत. त्यामुळे ई बँकिंग सेवा वापरण्याबाबत एक भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे. कष्टाने मिळवलेला पैसा हॅकर्स द्वारे हातोहात पसार केला जात असल्याचेही दिसून येत आहे. ई बँकिंग सेवा देणाऱ्या विविध प्रकारच्या बँकिंग संस्था आपल्या ग्राहकांना या सेवांच्या सुरक्षित वापराबाबत पुरेशा सूचना देताना दिसत नाहीत तसेच ग्राहकांच्यामध्ये जनजागृती करताना दिसत नाहीत. मात्र त्यामुळे जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे यावर एक उपाय योजना व आपली सामाजिक जबाबदारी म्हणून या महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ विजय कुंभार यांच्या कल्पक विचारांमधून व प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांच्या मार्गदर्शनामधून हे नाविन्यपूर्ण अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये बँक मॅनेजमेंट विभागातील ३०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी घेतला.  
विभागातील शिक्षक प्रा. भाग्यश्री वागडोळे, डॉ. सुनील गोंड प्रा.श्रीकांत गंगावणे प्रा.रोहिणी भोसले प्रा.माधुरी देशमुख प्रा.सत्वशीला माने प्रा. श्रद्धा गंगावणे प्रा. साजिया शेख प्रा.धनश्री छप्परकर प्रा. प्रतीक पोतेकर हे या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सामान्य जनतेचे प्रबोधन करण्यासाठी या विद्यार्थ्यांना इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग तसेच एटीएम सेवेच्या सुरक्षित वापराबाबतचे प्रशिक्षण देण्यात आलेले असून, या सर्व सेवांच्या वापराबाबतच्या व सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचनाबाबत विभागाने तयार केलेले माहितीपत्रक देऊन 1500 पेक्षा अधिक लोकांचे प्रबोधन केले. या अभियानामुळे सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेचे सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगाने व ई बँकिंग सेवा वापराच्या अनुषंगाने उत्तम प्रबोधन झाले असून त्यामुळे बँक अकाउंट हॅकिंग सारखे प्रकार कमी होऊन बँकिंग सेवा वापरकर्त्यांना सुरक्षितता वाटेल असे मत या अभियानाचे प्रमुख डॉ विजय कुंभार यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचा बँक मॅनेजमेंट विभाग हा नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अग्रेसर असून हा विभाग विविध प्रकारच्या समाजाभिमुख सेवा सुविधा देण्यासाठी देखील अग्रगण्य असतो. बँक मॅनेजमेंट विभाग सामाजिक जाणीव लक्षात घेऊन ई बँकिंग बाबतच्या सुरक्षिततेसाठी राबवलेले  अभियान स्तुत्य असून या अभियानामुळे सातारा जिल्ह्यातील जनतेला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे मत प्राचार्य डॉ बाळ कांबळे यांनी व्यक्त केले.