पामतेल तेलाचे २२०० डबे देण्याचे आमिष दाखवून प्रतापगंज पेठेतील भारत ट्रेडींग कंपनी किराणा होलसेल व रिटेल या दुकान व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत घडली.
सातारा : पामतेल तेलाचे २२०० डबे देण्याचे आमिष दाखवून प्रतापगंज पेठेतील भारत ट्रेडींग कंपनी किराणा होलसेल व रिटेल या दुकान व्यावसायिकाची तब्बल २० लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. १ मार्च ते १२ मार्च या कालावधीत घडली.
शिवानंद वसंत बारवडे (वय ३६, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रिशा जे. एम. डी. प्रा. लि. अंबालाचे डायरेक्टर भरत आरोरा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नमूद केले आहे की, चंद्रकांत श्याम सोनटक्के यांनी सुहास मधुकर नवरकर यांची ओळख करुन दिली. त्यावेळी त्यांनी प्रिशा जे. एम. डी. प्रा. लिमिटेड अंबाला सिटी हरियाणा या कंपनीमध्ये एरिआ सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असून, आपण प्रिशा कंपनीचे सूर्यकांती पामतेल विकावे, असे सांगून बारवडे यांचा विश्वास संपादन केले. पहिली डिलेव्हरी ११०० डब्यांची ठरल्यानंतर ११०० डबे पाठवण्यात आले. त्यानंतर २२०० डब्यांचे पैसे भरण्याचे संगितले. त्यानुसार फिर्यादीने २० लाख ७२ हजार ४०० रुपये भरली. मात्र, त्यानंतर संबंधितांनी फिर्यादीची फसवणूक केली. याचा तपास पोलीस निरीक्षक पतंगे करत आहेत.


