maharashtra

अपघात केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा


अपघात करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अपघात करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास वेळे तालुका वाई गावच्या हद्दीत सोळशी फाटा येथे पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर कविता गणपत चोरट राहणार आसरे, तालुका वाई या त्यांच्या पतीसमवेत स्कुटी वरून घरी जात असताना रत्नकांत शंकरराव कुंभार राहणार धनकवडी, पुणे याने त्याच्या ताब्यातील ईरटीका कारने क्र. एमएच 12 जेयु 0593 चोरट यांच्या स्कुटीस धडक दिली. या अपघातात चोरट दाम्पत्य जखमी झाले असून याबाबतची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.