महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्यातील शर्मा दांपत्यांचा संघर्ष प्रेरणादायी : नंदकुमार फडके

वयाच्या पाचव्या वर्षी अपघाताने कोपरापासून दोन्ही हात गमावलेल्या दिनेश शर्मा यांनी स्वतःच्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक, व्यावसायिक व वैवाहिक जीवनात उल्लेखनीय यश संपादन केले. या वाटचालीत त्यांची पत्नी नितू शर्मा यांनी दिलेली साथ कौतुकास्पद असून या दांपत्यांचा संघर्ष व त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार  साताऱ्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदकुमार फडके यांनी काढले.

esahas.com
महाराष्ट्र

वारुंजीत आठ एकर ऊस जळून खाक

वारुंजी (विमानतळ) ता. कराड गावच्या हद्दीत अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी 10 रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास माळ नावाच्या शिवारात ही घटना घडली. यामध्ये ७  शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन

पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागांसाठी वरदायिनी ठरणारा कृष्णा-भीमा स्थिरीकरण या महत्वकांक्षी प्रकल्पाबाबत राज्य सरकार उदासिन असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने हा प्रकल्प फायदेशीर आहे का? याबाबत राज्य सरकारकडे विचारणा केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही प्रतिसाद राज्याकडून मिळालेला नाही, असे उत्तर जलशक्ती मंत्रालयाकडून माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देण्यात आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराड विमानतळ परिघात लावलेले निर्बंध उठवा

कराड विमानतळ परिसरात  लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराड तालुक्यातील ११ हातपंपांचे पाणीनमुने दुषित

कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

पंधरा वर्षांच्या मुलीला मानलेल्या भावासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकून तिच्याशी गैरवर्तणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जया पवार, अभिजीत पवार रा. शाहूपुरी, महेश सोनवणे, कोमल पवार, उज्वला पवार रा. पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

चार दुचाकी चोरट्यांच्या आवळल्या स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या पथकाने मुसक्या; तीन दुचाकी जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) विविध केलेल्या कारवाईत चार दुचाकी चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडील तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांनी संबंधित दुचाकी वाठार, सातारा व नऱ्हे जि. पुणे येथून चोरल्या असल्याची कबुली दिली असून यातील काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

कराडात शाळेच्या संरक्षक भिंतीसाठी खोदलेल्या खड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.

esahas.com
महाराष्ट्र

मलकापूर नगरपालिकेच्या ‘माणुसकीच घर’ उपक्रमाचा शुभारंभ

मलकापूर नगरपालिकेला विविध नाविन्यपुर्ण संकल्पनेचा वारसा आहे. त्यानुसार नगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकत ‘माणुसकीच घर’ नावाचा नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका बहुउद्देशिय विस्तारित इमारत झेड.पी कॉलनी, पाणी बील संकलन केंद्र येथे ‘माणुसकीच घर’ नावाचा उपक्रम उभारला आहे. गुरुवारी ९ रोजी यांसंकल्पनेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

esahas.com
महाराष्ट्र

शिवसेनेच्या बोटाला धरुनच भाजप मोठा झाला हे विसरु नका!

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अडवाणी साहेबांना विचारावे की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब यांच्या बोटाला धरुनच भाजपा महाराष्ट्रात मोठी झाली आहे. नैराश्येतून वक्तव्य करणे टाळावे अन्यथा त्यांचा गावागावात शिवसैनिक समाचार घेतील, असा सुचक इशाराच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषदेत लगावला.