महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साताऱ्यात निदर्शने

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा निषेधार्थ राज्य व केंद्र सरकारचा जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आला. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली.

esahas.com
महाराष्ट्र

सोशल डिस्टन्सप्रकरणी सातारा पालिका आक्रमक

सातारा पालिका व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी शहरातील आठ दुकानदारांवर फिजिकल डिस्टन्सचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई केली. संबंधितांकडून प्रत्येकी पाचशे असा एकूण चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल

होणार- होणार म्हणून चर्चेत असणाऱ्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचे पाणी अखेर शाहूपुरीत दाखल झाले. या योजनेच्या उपसापंपाची कळ दाबून खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

esahas.com
महाराष्ट्र

दिव्यांग व ज्येष्ठांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा

कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

दिव्यांग व ज्येष्ठांनी कृत्रिम अवयव व साधने आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्या : विनय गौडा

सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या व राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

esahas.com
महाराष्ट्र

सुकन्या समृध्दी योजना ही पालकांची भविष्यकालिन चिंता मिटवणारी  : खा. उदयनराजे भोसले

भारत सरकारच्या डाक विभागामार्फत प्रामुख्याने बचतीच्या आणि गुंतवणुकीच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यातीलच सुकन्या समृध्दी ही योजना प्रत्येक कन्यारत्न लाभलेल्या पालकांची बचती बरोबरच भविष्यकालिन चिंता मिटवणारी योजना आहे.

esahas.com
महाराष्ट्र

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या बंगल्याजवळ बिबट्याचे दर्शन

मंगळवारी मंत्री शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्यानंतर लोकांनी आरडा- ओरडा केल्यानंतर या बिबट्याने त्या ठिकाणावरून धूम ठोकली. मंत्री शंभूराज देसाई हे स्वतः निवासस्थानाच्या शेजारील लाॅनवरती असताना बिबट्याचा  निवासस्थानी वावर होता.

esahas.com
महाराष्ट्र

परदेशी भामट्यांनी बनविली होती वीस बँकांची बनावट कार्ड

दोन परदेशी भामट्यांनी बनावट एटीएम कार्डद्वारे लोकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच त्यांनी मलकापूरसह कोल्हापुरातही बनावट एटीएमद्वारे पैसे काढल्याची कबुली त्यांनी दिली होती. आता या परदेशी भामट्यांनी तब्बल वीस बँकांची बनावट कार्ड बनविली असल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे. तसेच त्यांच्याकडील पासपोर्टही बोगस असल्याचे आढळून आले आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विवाहितेला जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

विवाहितेला त्रास देवून जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कराड तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव

अवकाळी पावसानंतर विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. यामध्ये अनेक गावांमध्ये चिकुन गुनिया सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. ताप, सर्दी, खोकल्याबरोबरच सांधे आखडणे आदी. लक्षणे रुग्णांना दिसून येत आले. परंतु, त्यासंबाधित तपासणी केल्यास त्या अहवालात नेमके निदान समोर येत नसले तरीही चिकुन गुनियासारखी लक्षणे आढळून येत असल्याने तालुक्यात चिकुन गुनिया सदृश्य साथीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे.