पंधरा वर्षांच्या मुलीला मानलेल्या भावासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकून तिच्याशी गैरवर्तणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जया पवार, अभिजीत पवार रा. शाहूपुरी, महेश सोनवणे, कोमल पवार, उज्वला पवार रा. पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा : पंधरा वर्षांच्या मुलीला मानलेल्या भावासोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकून तिच्याशी गैरवर्तणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात पाचजणांवर विनयभंगासह बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जया पवार, अभिजीत पवार रा. शाहूपुरी, महेश सोनवणे, कोमल पवार, उज्वला पवार रा. पुणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी पंधरा वर्षांची असून तिला मानलेल्या भावासमवेत लग्न कर, असे म्हणून तिला जया पवारने त्या मुलाच्या अंगावर ढकलले. यावेळी पीडित मुलगी घरातून जात असताना तिला बाहेर जाण्यास अटकाव करण्यात आला. तर यातील एका मुलाने पीडित मुलीशी गैरकृत्य केले. या प्रकाराची माहिती मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर आईने पवार हिच्या पतीला फोन करून हा प्रकार सांगितला. त्यावेळी संबंधिताने तुला काय करायचे तर कर, अशी दमदाटी केली. एवढेच नव्हे तर सर्वांनी पीडितेच्या घरात येऊन शिवीगाळ केली. या प्रकारामुळे घाबरून पीडित मुलगी रात्री निघून गेली. मात्र, परत सकाळी सहा वाजता आली. दरम्यान या घटनेनंतर मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जगताप हे करीत आहेत.


