maharashtra

राजधानी सातारा मध्ये श्री. छ. शिवाजी महाराजच वंचित 

श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने

In the capital Satara, Shri. Is. Only Ch. Shivaji Maharaj is deprived
श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असताना दिसून येत आहे. त्याचे मागून राजधानी सातारा चा सेल्फी पॉईंचे पण काम सुरु होऊन पूर्ण होऊन त्याचे मोठ्या दिमाखात उदघाटन पण झाले. एवडी सगळी कामे जलद गतीने होत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत कि त्या श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे करत आहेत

          सातारा येथील पोवई नाका परिसरात वारंवार होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी थांबवणेसाठी लोकप्रतिनिधींनी ग्रेड सेप्रेटर ( भुयारी मार्ग ) ची खरोखरच छान योजना आणली आणि टी अँड टी  कंपनीने वेळेत पूर्णत्वास पण नेहली त्यातून सातारा  तसेच पोवईनाका परिसरातून होणारी वाहतूक काही प्रमाणात सुखद पण होताना दिसत  आहे. पण यासर्वांमध्ये  पुरेसा निधी उपलब्ध  असताना पण श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असताना दिसून येत आहे. त्याचे मागून राजधानी सातारा चा सेल्फी पॉईंचे पण काम सुरु होऊन पूर्ण होऊन त्याचे मोठ्या दिमाखात उदघाटन पण झाले. एवडी सगळी कामे जलद गतीने होत असताना अशा कोणत्या अडचणी आहेत कि त्या श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे करत आहेत. एकीकडे श्री. छ. शिवाजी महाराज शासकीय वस्तू संग्रालययाच्या नवीन इमारतीमध्ये सुरु झालेले कोविड जम्बो सेंटर बंद पडले तरी जिल्हाधिकारी सातारा पुन्हा संग्रालयाची वास्तू  श्री. छ. शिवाजी महाराज शासकीय वस्तू संग्रालयास हस्तांतर करायला टाळाटाळ करीत आहेत तर दुसरीकडे श्री. छ. शिवाजी महाराज पुतळा परिसराचे काम धीमे गतीने सुरु आहे यातून राजधानी सातारा मध्ये श्री. छ. शिवाजी महाराजच वंचित झालेत अशी भावना सर्वसामान्य जनतेने साहसवार्ता समोर मांडल्या आहेत.