सातारा हिल मॅरेथॉन व जोर्तिमय साठी सातारा जिल्हा प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
सातारा जिल्हा जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कमिटी, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांनी कोरोना प्रसार मोहिमेसाठी रविवारचा दिवस ठेवला होता का?
दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी सातारा शहरामध्ये दोन विशेष कार्यक्रम संपन्न झाले यामध्ये कोरोना नियमांची सर्रास पायमल्ली झालेली काल दिसून आली. सर्वसामन्य नागरिकांना लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० माणसांची मर्यादा टाकून प्रशाशनाने सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय यासाठी विशेष योजनेअंतर्गत कोरोना नियमनाची पायमल्ली करायची परवानगी दिलेप्रमाणे काल दोन्ही कार्यक्रमात वस्तुस्थिती दिसून येत होती, जणू काही प्रशासन दोन्ही आयोजकांचे खिशातच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वसामान्य आणि दुकानदार तसेच व्यापारी यांनी मास्क नाही घातला तर प्रशासन हजारो रुपयांचा दंड आकारते पण काल झालेल्या सातारा हिल मॅरेथॉन आणि जोर्तिमय या कार्यक्रमात कोविड नियमाची पायमल्लीसाठी आता प्रशासन किती दंड आकारणार व कोणती कारवाई करणार यावर सर्वसामान्य जनता, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्ष ठेवून राहणारच आहेत.

जिल्हा परिषद पटांगणावर जोर्तिमय महोत्सव ( यात्रा ) कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था आयोजक आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने तैनात केली न्हवती. त्यामुळे सातारा - कोरेगाव रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी, सर्वसामान्य नागरिक, महिला अबालवृद्ध तसेच रुग्णांना वाहतूक कोंडीच्या समस्यास सामोरे जावे लागले. यासंदर्भांत काही जागरूक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क केला असता, सादर जोर्तिमय कार्यक्रमास सातारा जिल्हाधिकारी यांचे परवानगीने सुरु असून त्यास सातारा अधीक्षक कार्यालयाकडून परवानगी दिली नाही तरीपण नागरिकाचा त्रास पाहून पोलीस प्रशासनाने वाहतूक पोलीस तैनात करून नागरिकांना काहीसा दिलासा दिला.
सातारा हिल मॅरेथॉन दरवर्षी आयोजित करत असतात या आयोजनामध्ये सांबारवाडी, यवतेश्वर ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सातारा हिल मॅरेथॉन दरवर्षी सातारा - कास मार्गावर आयोजित केली जाते यासाठी सदरचा मार्ग सकाळी ६ ते ९ वाजेपर्यन्त सर्वसामान्यांसाठी बंद केला जातो या वेळेत अबालवर्ध तसेच नोकरवर्गाचा कामावर वेलेवल न पोहचणे, रुग्णांना उपचारासाठी विलंब होणे, अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांचेसाठी कोणत्याही प्रकारचा पर्यायी मार्गाचा विचार न करता रास्ता विकत घेतलेप्रमाणे प्रशासनास हातासी घेऊन पूर्ण मार्ग अडविला जातो. नाहक या परिसरातील लोकांना त्रास दिला होतो असे साहसवार्ता सी बोलताना नागरिकांनी आपली बाजू मांडली.
सातारा हिल मॅरेथॉन व जोर्तिमय या दोन्ही कार्यक्रमासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तक्रार दाखल करणेचे तयारीत असलेची माहिती साहसवार्ता सी बोलताना दिली आहे. एका बाजूला शाळा, कॉलेज यासारख्या महत्वाच्या गोष्टीननिर्भध आणि दुसरे बाजूने सातारा हिल मॅरेथॉन व जोर्तिमय अशा कार्यक्रमांना परवानगी यातून जिल्हा प्रशासनाचे धोरण संशयाचे भवरा निर्माण करणारे होत आहे. कोरोना नियम सर्वांना एकसारखे असले पाहिजेत परंत्तू प्रशासन असे न करता सर्वसामान्य दंड आणि धनदांडगेन्यासाठी पायघड्या अशी वागणूक करत आहे. प्रशासनाची हि वागणूक ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी होत आहे.