महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

कराडात विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

शहरात नगरपालिका आणि पोलिसांनी गुरुवारी विनामास्क वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. या संयुक्तिक मोहिमेत अनेक वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी शहरात अचानकपणे करण्यात आलेल्या कारवाईमुळे अनेक वाहनचालकांची पंचाईत झाल्याचे दिसून आले.

esahas.com
महाराष्ट्र

पत्रकारदिनी दर्पणकारांना अभिवादन

सातारा जिल्ह्यात गुरूवारी पत्रकार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. सातार्‍यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात विविध विधायक उपक्रमांनी पत्रकार दिन साजरा झाला. यामध्ये अनेक सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला.

esahas.com
महाराष्ट्र

खासदार उदयनराजे भोसले यांनी लुटला पुष्पा चित्रपटाचा आनंद

साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.

esahas.com
महाराष्ट्र

राज्यातील व देशातील इतर सहकारी बँकांनी सातारा जिल्हा बँकेचा आदर्श घ्यावा : नितीन पाटील

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ‘खंडाळा शाखा व विभागीय कार्यालय, खंडाळा ’ या नूतन इमारतीचे नुतनीकरण उदघाटन बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शुभहस्ते आणि संचालक दत्तानाना ढमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.  

esahas.com
महाराष्ट्र

दरोडेखोरांच्‍या हल्ल्यात महिला जखमी; ५ लाखांचा ऐवज लंपास

पुसेसावळीत मंगळवारी मध्‍यरात्री दरोडेखोरांच्‍या टोळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे १२ तोळे सोने, १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

ओगलेवाडीत बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी युवकास अटक

ओगलेवाडी, ता. कराड येथे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगणार्‍या युवकास पोलिसांनी अटक केले. बुधवार दि. ५ रोजी दुपारी ओगलेवाडी चौक येथील भाजी मंडई परिसरात कारवाई करण्यात आली. मुबिन युन्नुस पटेल (वय 26) रा. हजारमाची ता. कराड असे बेकायदेशीररीत्या पिस्तुल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

esahas.com
महाराष्ट्र

38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी

येथील विकास नगर परिसरातुन अज्ञात चोरट्याने 38 हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी केसिंगची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा तालुक्यात दोन दुचाकींची चोरी

सातारा तालुक्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

बिबट्याचा शेळीवर हल्ला

पाटण तालुक्यातील त्रिपुडी येथे मध्यरात्री लक्ष्मण धोंडीबा देसाई यांच्या घरातील गोठ्यात शेळीवर रात्री १२ वाजता बिबट्याने हल्ला केल्याने शेळी जागीच ठार झाली आहे. शेळीचा धडपडण्याचा आवाज येताच आरडाओरडा केल्याने बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत शेळी जागीच ठार झाली होती.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी

जिल्ह्यात पाचठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत.