maharashtra

छत्रपती शाहू महाराजांची घसरगुंडीची सत्य कथा…अनेकदा इतिहासात याबद्दल सांगण्यात आले आहे..

सर्वप्रथम शाहू महाराजांची घसरगुंडी नेमकी अस्तित्वात आहे का आणि आहे तर कुठे आहे

Chhatrapati Shahu Maharaj's true story of Ghasargundi… It has been told many times in history ..
छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक कि-स्से आजवर अनेक वेळा रचले गेले आणि विशेष म्हणजे हे बदनामीचे कि-स्से राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीत त्यांच्या विरोधकांनीरचले होत,असे सांगितले जाते. त्यामुळे अशा अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या होत्या.

  छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक कि-स्से आजवर अनेक वेळा रचले गेले आणि विशेष म्हणजे हे बदनामीचे कि-स्से राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीत त्यांच्या विरोधकांनीरचले होत,असे सांगितले जाते. त्यामुळे अशा अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या होत्या. पण एक वेळ अशी आली होती की, याच विरोधकांनी शाहू महाराजांचा कोल्हापुरात एकही स्त्री सुरक्षित नाही अशा आशयाचे पत्र इंग्लंडला पाठवले होते.
मात्र याच एका खोट्या पत्राला इंग्रजांनी कचऱ्याची पेटी दाखवली होती. मात्र मुद्दा हा आहे की, शाहू महाराजांवर एक खोट्या करण्याची काही विशेष कारणे सांगितले जातात. तर यामध्ये त्यांनी अस्पर्श्यता आणि जातीवादी वादावर जोरदार प्रहार केला होता आणि दलिताना मोठ्या संधी निर्माण केला होत्या. तसेच समतेचा पाया रचला होता.
मात्र त्यांना याचा झालेला तोटा म्हणजे त्यांच्या बद्दलचा रचल्या गेलेल्या कल्पित कथा होय. यामधील एक प्रसिद्ध कथा म्हणजे शाहू महाराज घसरगुंडीची कथा होय. यामध्ये शाहू महाराज या घसरगुंडीच्या मार्फत या महिलांसोबत दुराचार करत असतात,अशा अ’फवा पसरल्या होत्या. सर्वप्रथम शाहू महाराजांची घसरगुंडी नेमकी अस्तित्वात आहे का आणि आहे तर कुठे आहे, हे पहिल्यांदा पाहावे.
तर शाहू महाराजांनी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर स्काऊट बंगला कॅम्प पासून तीन परलाच्या अंतरावर सोनतली गाव वसवले होते. यालाच सोनतली कॅम्प असं म्हटल्या जातात. त्या गावात महाराजांनी भटक्या आणि अस्पृश्य लोकांना जागा देवून वसाहत निर्माण केली. तसेच कुर्ण उभारून रेस घोड्यांची पैदास केली.
तिथे बरेच रानटी पशु असायचे. महाराज आठवड्यातून तरी तीन-चार दिवस या ठिकाणी मुक्कामाला असायचे. बंगल्याच्या आवारात प्रवेश द्वारा घसरगुंडी आहे. जसे लहान मुलांना खेळण्यासाठी असते, तशी काटकोन आकृती दगडी बांधकामाची सुमारे 20 फूट उंची 4 फूट रुंदीची अशी दगडी घसरगुंडी आहे.
तर महाराज या घसरगुंडीचा वापर यांची माहिती म्हणजे या घसरगुंडीची अधिक माहिती शाहू महाराज मूर्ती दर्शन या हिंदुराव साळुंखे यांच्या पुस्तकातील लेखकाने स्वतः या ठिकाणी भेट दिल्या.ते म्हणतात की,” मी या ठिकाणी भेट दिली महाराजांचा नोकरीत असलेल्या एका वृद्ध मला भेटला आणि त्याच्यासोबत बंगला पाहिला त्यांना सर्व माहिती दिलेली सांगितली. महाराजांची घसरगुंडी पण पाहिली.
महाराजांची उंची 6 फूट 4 इंच होती. त्यांचं वजन सतत वाढायचं. डॉ’क्टरांनी त्यांना वजन कमी केले नाही तर प्रकृतीस धो’का असल्याचे सांगितलं होतं. त्या अनेक प्रकारचे व्यायाम करायचे. घसरगुंडीचा व्यायाम प्रकार देखील यातील एक होता. यामध्ये एका बाजूनं महाराज दगडी पायऱ्या दोन्ही लोखंडे यांना धरून वर चढून वरच्या मजल्यावर थोडं थांबत असत आणि लोखंडी नळ्याना धरून खाली येत. प्रत्येक वेळी थोडा-थोडा वेग वाढवीत अं’गात सदरा व खाली लुंगी असे घामाने चिंब भिजल्या नंतर दुसऱ्या बाजूला बसून घसरत खाली येत असत.
अं’गातून घामाच्या धारा सदरा चिंब भिजून खाली गळेपर्यंत हा व्यायाम चाले. खाली एक टॉवेल आणि दुसरे कपडे घेऊन एक माणूस सज्ज असायचा. त्यामुळे ही घसरगुंडी शाहू महाराजांनी व्यायामासाठी करून घेतली होती. मात्र विरोधकांचा कल्पक डोक्यातून घसरगुंडी सं-बंधी अनेक निंदनीय कहाण्या पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्या खोट्या आहेत हे पुराव्यानिशी हे वारंवार सिद्ध झाले आहे