श्री सेवागिरी महाराजांच्या पुण्यस्मरणानिमित्त भरणारी यात्रा ही सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेची आहे. या यात्रेदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये तळागाळातील प्रत्येकाचा सहभाग असतो. त्यामुळे ही यात्रा आगळीवेगळी असून या यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेची ख्याती आणखी वाढावी म्हणून आणि पुसेगावचा विकास आराखडा मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
आज कोरोना काळात उद्योग, व्यवसाय यांची वाईट अवस्था आहे आहे, नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा घाईला आली आहे. अशातच पुसेगाव ता खटाव येथील कराड अर्बन बॅकेच्या शाखेत सापडलेली अर्ध्या तोळ्यांची सोन्याची अंगठी पुसेगावचे प्रतिष्ठित नागरिक पृथ्वीराज जगन्नाथ जाधव यांनी प्रामाणिकपणे परत केली.
गेल्या २० दिवसापासून पुसेगाव ता खटाव येथे गवंडी काम करणारा राजू चंद्रबली पटेल (वय ३२) हा परप्रांतीय मजुर १४ डिसेंबर पासून अचानक गायब झाला आहे. ती व्यक्ती हरवली का भांडणातून हत्या झाली, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही, त्यामुळे पोलीस यंत्रणाही कामाला लागली आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या बदनामीचे अनेक कि-स्से आजवर अनेक वेळा रचले गेले आणि विशेष म्हणजे हे बदनामीचे कि-स्से राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीत त्यांच्या विरोधकांनीरचले होत,असे सांगितले जाते. त्यामुळे अशा अनेक कपोलकल्पित कथा रचण्यात आल्या होत्या.
येथील तहसीलदार कार्यालयासमोर असणार्या मेडिकल समोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील सदरबझारमध्ये ट्रक पार्किंग केल्याचा राग मनात धरून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.
शहराजवळ वाढे फाटा येथे महामार्गावर गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. तर त्याच्यापाठीमागे बसलेल्या एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतानाही येथील जिल्हा रुग्णालय व सातारा शहर परिसरात आपले अस्तित्व लपवून वावरत असताना आढळून आल्याने सुरज राजु माने, रा. लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सदरबझार, सातारा याच्याविरोधात आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दरोडेखोरांचा सुळसुळाट वाढला असून फक्त दोन दिवसांत चारठिकाणी घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांमध्ये दरोडेखोरांनी तब्बल 6 लाख 32 हजारांचा ऐवज लंपास करण्यात यश मिळवले आहे.
कोरोना संक्रमण वेगाने वाढू लागल्याने सातारा पालिकेने देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. पथकाने पहिल्याच दिवशी राजवाडा परिसरात विनामास्क फिरणाऱ्या दोघांवर कारवाई करून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल केला.