maharashtra

भरतगाववाडी हद्दीत अपघातात पाच जखमी


Five injured in Bharatgaonwadi accident
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रकने वॅगनर कारला धडक देऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रकने वॅगनर कारला धडक देऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील वॅगनर कारमधून पुण्याकडे जात असताना भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अभिषेक वाईंगडे, शुभांगी एकशिंगे, सर्जेराव भोईटे, प्रवीण एकशिंगे, सचिन एकशिंगे (पूर्ण पत्ता समजू शकला नाही) हे जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.